गुंड दाऊद इब्राहिम याला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी ड्रेसिंग रूममधून हाकलून दिले होते, असा दावा माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी केला.
नवी दिल्ली- कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी ड्रेसिंग रूममधून हाकलून दिले होते, असा दावा माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी जळगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केला.
१९८६मध्ये शारजा येथे आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता. या सामन्यापूर्वी दाऊद इब्राहिम भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये आला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवले तर भारतीय संघातील खेळाडूंना टोयोटा कार भेट देऊ, असे दाऊदने म्हटले होते. तेव्हा कपिलदेव यांना राग आला व त्यांनी दाऊदला बाहेर जाण्यास सांगितले, असे वेंगसरकर म्हणाले.