मी लवकरच पुण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात मी संपूर्ण महाराष्ट्राभर फिरून सभा घेणार आहे. माझा एफटीआयआय, फग्र्युसन व रानडेमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे.
पुणे – मी लवकरच पुण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात मी संपूर्ण महाराष्ट्राभर फिरून सभा घेणार आहे. माझा एफटीआयआय, फर्ग्युसन व रानडेमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे. जे जे विद्यार्थी आंदोलन करतील; त्यांच्या त्यांच्या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी मी जाणार आहे, अशी माहिती कन्हैया कुमार याने दिली आहे. तसेच आपण भाजयुमो किंवा आभविपच्या धमक्यांना भीक घालत नाही, असेही कन्हैयाने म्हटले आहे.
पुण्यातील काही कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत संयुक्त विचार मंचाची स्थापना केली आहे. या विचार मंचाने रविवारी पत्रकार परिषद घेत कन्हैयाकुमारला आम्ही पुण्यात बोलवणारच, अशी घोषणा केली होती. आम्ही कन्हैयाच्या संपर्कात आहोत, असेही या विद्यार्थ्यांनी सांगितले होते. सोमवारी त्याला खुद्द कन्हैया कुमारने पुष्टी दिली आहे. या विद्यार्थ्यांसोबतच युवक क्रांती दलाचे (युक्रांद) अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनीही गांधी भवन येथे कन्हैयाकुमारची सभा व तरुणासोबत संवादाचा कार्यक्रम घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
कन्हैयाकुमारला पुण्यासोबतच मुंबई, बीड, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आदी शहरांतूनही संवादासाठी निमंत्रित केले आहे. या सर्व ठिकाणी आपण जाणार असल्याचे कन्हैयाने सोमवारी स्पष्ट केले. आम्ही ‘जेएनयू’मधील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याला चर्चेला बोलावले आहे. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत. कन्हैया लवकरच पुण्यात येईल, अशी आशा आहे. भाजयुमो किंवा अभाविपच्या धमक्यांना आम्ही विद्यार्थी भीक घालत नाही, अशी भूमिका पुण्यातील रानडे इन्स्टिटय़ूटमधील विद्यार्थ्यांनी चार दिवसांपूर्वीच घेतली होती; मात्र कन्हैयाकुमारला चचेर्ला बोलवाल तर बघून घेऊ, अशी धमकी भाजयुमोने दिली होती. या पार्श्वभूमीवर रानडेमधील विद्यार्थ्यांनी कन्हैयाला येथे आणण्याचा निर्धारच व्यक्त केला आहे.