जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर कार्यक्रम सुरु असताना एका विद्यार्थ्यांने ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत कन्हैय्याच्या दिशेने चप्पल फेकली.
हैदराबाद- जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर कार्यक्रम सुरु असताना एका विद्यार्थ्यांने ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत कन्हैय्याच्या दिशेने चप्पल फेकली.
हैदराबाद विश्वविद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. चप्पल फेकण्याचा प्रयत्न करणा-या त्या विद्यार्थ्यांला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कन्हैय्या कुमार सध्या हैदराबाद येथे असून बुधवारी हैदराबाद विश्वविद्यापीठाला भेट देण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला गेटवरच रोखण्यात आले होते. रोहीत वेमुला आत्महत्येप्रकरणी कन्हैय्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी बोलत असताना हा प्रकार घडला.