जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारने अखेर शनिवारी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, कन्हैया वगळता जेएनयूतील अन्य विद्यार्थ्यांचे दहाव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारने अखेर शनिवारी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे कन्हैया कुमारने सांगितले. तसेच कन्हैया वगळता जेएनयूतील अन्य विद्यार्थ्यांचे दहाव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.
कन्हैया कुमार हा देशविरोधी घोषणांची चौकशी करणा-या समितीच्या निषेधार्थ बेमुदत उपोषणास बसला होता. त्याचे हे उपोषण ९ दिवसांपासून सुरू होते. गुरुवारी उपोषणाच्या आठव्या दिवशी कन्हैयाची प्रकृती खालावल्यामुळे त्याला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कन्हैयाला शनिवारी एम्स रुग्णालयातून सोडण्यात आल्याचे जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
दरम्यान, कन्हैया कुमारसह पाच जणांनी उपोषण मागे घेतले असून अद्यापही १५ विद्यार्थ्यांनी आपले उपोषण सुरू ठेवले आहे. आता कन्हैयाची प्रकृती स्थिर असून त्याला काही दिवसांकरिता विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्याला अशक्तपणा आला असून रक्तदाब कमी झाला होता.
जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी रोजी दिलेल्या देशविरोधी घोषणांच्या घटनेची चौकशी करणा-या उच्चस्तरीय चौकशी समितीने कन्हैयासह अन्य १८ विद्यार्थ्यांना दोषी ठरविले आहे. त्याच्या निषेधार्थ जेएनयूतील १४ विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे.
[EPSB]
प्रकृती खालावल्याने कन्हैया कुमार रुग्णालयात
मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याची प्रकृती गुरुवारी खालावली.
‘जेएनयू’तून उमर खालिद निलंबित, कन्हैया कुमारला १० हजारांचा दंड
जेएनयू विद्यापीठातील उमर खालिदला एका सत्रासाठी निलंबित केले असून, २० हजार रुपयांचा दंड तर, विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला १० हजार रुपयांचा दंड केला आहे.
[/EPSB]