जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना बीरवाह मतदारसंघातूून विजय मिळाला आहे मात्र सोनावरमधून त्यांना पराभूत व्हावे लागले आहे.
श्रीनगर –जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी यंदा सोनावर आणि बीरवाह या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यामध्ये ओमर यांना बीरवाह मतदारसंघातूून विजय मिळाला आहे मात्र सोनावरमधून त्यांना पराभूत व्हावे लागले आहे.
बीरवाह मतदारसंघातून ओमर यांनी एक हजार मतांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे नाझीर अहमद खान यांना पराभूत केले. तर सोनावर मतदारसंघातून पीडीपीचे उमेदवार मोहोम्मद अश्रफ मीर यांनी ओमर यांचा पराभव केला.निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच पीडीपीचे मोहोम्मद मीर आघाडीवर होते.
सोनावर मतदारसंघातून विजयी झालेले पीडीपीचे उमेदवार मोहोम्मद मीर यांचे ओमर यांनी ट्विटरवरुन अभिनंदन केले.