ओडिसाच्या मयुरभंज जिल्ह्यातील कुदसाही गावात बुधवारी भारतीय हवाईदलाचे लढाऊ विमान कोसळले.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/06/crashed-MiG-21.jpg)
भुवनेश्वर – ओडिसाच्या मयुरभंज जिल्ह्यातील कुदसाही गावात बुधवारी भारतीय हवाईदलाचे लढाऊ विमान कोसळले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजून १० मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. विमान कोसळल्यानंतर तेथे मोठा स्फोटही झाला. दरम्यान या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने गावक-यांनी दुर्घटनास्थळी एकच गर्दी केली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. घटनेनंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना कऱण्यात आले असून आणखी दोन अग्निशमन दलाची पथके रवाना कऱण्याचे आदेश देण्याची आल्याची माहिती अधिका-यांनी दिली.