८६ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळयात ‘१२ इअर्स अ-स्लेव’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला..
लॉस एंजलेस – डॉल्बी सभागृहात रंगलेल्या ८६ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळयात ‘१२ इअर्स अ-स्लेव’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला.
यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांवर ग्रॅव्हिटीने ठसा उमटवला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह एकूण सात पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. तांत्रिक विभागातील सर्वाधिक पुरस्कार ग्रॅव्हिटीला मिळाले.
यंदा ग्रॅव्हिटी आणि अमेरिकन हसलला सर्वाधिक नामांकने मिळाली होती. ‘ब्लू जास्मिन सिनेमासाठी केट ब्लँचेटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर, डल्लास बायर्स क्लब’ या सिनेमातील भूमिकेसाठी अभिनेता मॅथ्यू मॅकॉन्वेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
१२ इयर्स अ स्लेव्हसाठी लुपिता न्यॉंगला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा तर, जारेडे लेटोला डल्लास बायर क्लबसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
फ्रोझनला सर्वोत्कृष्ट अँनिमेटड चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. परदेशी भाषा चित्रपट विभागात द ग्रेट ब्युटी सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये ग्रॅविटीला दहा तर, अमेरिकन हसलला दहा नामांकने मिळाली आहेत.
ऑस्कर पुरस्कार २०१३चे मानकरी
>सर्वोत्कृष्ट चित्रपट – ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह
>सर्वोत्कृष्ट अभिनेता – मॅथ्यू मॅकॉनॉई (डॅलास बायर्स क्लब)
>सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – केट ब्लांचेट (ब्लू जास्मिन)
>सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अल्फोन्सो कुआरॉन (ग्रॅव्हिटी)
>सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता – जेरेड लेटो (डॅलास बायर्स क्लब)
>सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री – नुपिटा ल्योंगो (ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह)
>सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा – ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह
>सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – हर
>सर्वोत्कृष्ट बिगर-इंग्रजी चित्रपट – द ग्रेट ब्युटी (इटली)
>सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट – फ्रोझन
>सर्वोत्कृष्ट मूळ गीत – लेट इट गो (फ्रोझन)
>सर्वोत्कृष्ट मूळ संगीत – ग्रॅव्हिटी
>सर्वोत्कृष्ट वेशभूषा – द ग्रेट गॅट्सबी
>सर्वोत्कृष्ट रंगभूषा – डॅलास बायर्स क्लब
>सर्वोत्कृष्ट छायालेखन – ग्रॅव्हिटी
>सर्वोत्कृष्ट दृक् परिणाम – ग्रॅव्हिटी
>सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन – द ग्रेट गॅट्सबी
>सर्वोत्कृष्ट संकलन – ग्रॅव्हिटी
>सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन – ग्रॅव्हिटी
>सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण – ग्रॅव्हिटी
>सर्वोत्कृष्ट माहितीपट – २० फीट फ्रॉम स्टारडम
>सर्वोत्कृष्ट लघुपट – हेलियम
>सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट – मिस्टर हुब्लोट
>सर्वोत्कृष्ट लघू माहितीपट – द लेडी इन नंबर सिक्स