रेड बुल कँपस टी-२० क्रिकेट २०१७ राष्ट्रीय फायनल्स स्पर्धेत माजी विजेता एमएमसीसी, पुणे कॉलेज संघाने किताब राखला. अंतिम लढतीत त्यांनी डीएव्ही कॉलेज, जालंधर संघाचा पराभव केला.
मुंबई – रेड बुल कँपस टी-२० क्रिकेट २०१७ राष्ट्रीय फायनल्स स्पर्धेत माजी विजेता एमएमसीसी, पुणे कॉलेज संघाने किताब राखला. अंतिम लढतीत त्यांनी डीएव्ही कॉलेज, जालंधर संघाचा पराभव केला. या जेतेपदामुळे एमएमसीसी संघाला सलग दुस-या वर्षी जागतिक टी-२० कॉलेज क्रिकेट फायनल्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
रेड बुल कँपस टी-२० क्रिकेट २०१७ राष्ट्रीय फायनल्स स्पर्धा ३० मे ते २ जून २०१७ या कालावधीत झाली. त्यात पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या चार विभागांतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांनी भाग घेतला. अंतिम लढतीत पश्चिम विभागाचा विजेता संघ एमएमसीसी आणि उत्तर विभागाचा उपविजेता संघ डीएव्ही महाविद्यालयाचा संघ आमनेसामने होता. त्यात एमएमसीसी संघाने बाजी मारली आणि जेतेपद राखले. स्पर्धेतील सवरेत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार एमएमसीसीच्या यश नहारने मिळवला. डीएव्हीचा प्रेरित दत्त सवरेत्कृष्ट गोलंदाज ठरला. अल फलाह विद्यापीठाचा (नवी दिल्ली) राहुल डागरला सवरेत्कृष्ट अष्टपैलू म्हणून गौरवण्यात आले. सलग दोन वेळचा विजेता एमएमसीसी संघ आता श्रीलंकेत होणा-या जागतिक टी-२० कॉलेज क्रिकेट फायनल्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल.