अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सी(एनएसए) या संरक्षण संस्थेकडून सुरू असलेल्या टेहळणी कार्यक्रमावर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिकी सिनेटच्या एका महत्त्वाच्या समितीने गुरुवारी एका विधेयकाला मंजुरी दिली. अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सी(एनएसए) या संरक्षण संस्थेकडून सुरू असलेल्या टेहळणी कार्यक्रमावर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिकी सिनेटच्या एका महत्त्वाच्या समितीने गुरुवारी एका विधेयकाला मंजुरी दिली. अलीकडेच या संस्थेकडून झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे जगभरात खळबळ उडाली होती.
तसेच अमेरिकेच्या सहकारी देशांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच या टेहळणी कार्यक्रमात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हे विधेयक तयार करण्यात आले आहे.
या विधेयकातील तरतुदींनुसार संभाषणांची मोठया प्रमाणावर गोळा केली जात असल्यास काही अपवाद वगळून त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास १० वर्षापर्यंतच्या शिक्षेचीही तरतूद केली आहे.