माजी सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे
नवी दिल्ली – माजी सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांच्या नेमणुकीला हिरवा कंदील दाखवला आहे. दत्तू यांच्या नावाची शिफारस आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठवली आहे.
गेल्या दोन डिसेंबर रोजी दत्तू हे सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. आता ते राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्षपदी त्यांना पाच वर्षे काम करता येऊ शकेल. दत्तू यांनी १९७५ पासून वकिली व्यवसायाला प्रारंभ केला.