दोन जागांवरून निवडणूक लढवणा-या उमेदवारांना प्रतिबंध घालण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.
नवी दिल्ली- दोन जागांवरून निवडणूक लढवणा-या उमेदवारांना प्रतिबंध घालण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.
एकाच सभागृहात निवडूण येण्यासाठी दोन जागांवरून उमेदवाराने निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती पी.संथाशिवम आणि न्यायमूर्ती एन.व्ही.रामण यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे.