उरण मोरा रोडवरील बेलदारवाडाजवळील जुन्या खाणीत पाण्याच्या धबधब्यातून दगड नीलेश एकलदेवी या मुलाच्या डोक्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
उरण- उरण मोरा रोडवरील बेलदारवाडाजवळील जुन्या खाणीत पाण्याच्या धबधब्यातून दगड नीलेश एकलदेवी या मुलाच्या डोक्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर साहिल वाल्मिकी हा मुलगा जबर जखमी झाला.
ही घटना रविवारी दुपारी घडली. नीलेश त्याच्या मित्रांसह या धबधब्यात सहलीसाठी गेला होता. आपल्या मित्रासोबत धबधब्याखाली उभा असताना वरून एक दगड त्याच्या डोक्यात पडला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या वाल्मिकीला वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले.