दिल्लीत पाच डिसेंबर रोजी झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर उबेर कंपनीच्या टॅक्सी सेवेवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला.
नवी दिल्ली– दिल्लीत पाच डिसेंबर रोजी झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर उबेर कंपनीच्या टॅक्सी सेवेवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला.
दरम्यान या प्रकरणी टॅक्सी चालकाविरुद्ध दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन जानेवारी रोजी होणार आहे.
पोलिसांनी टॅक्सी चालक शिवकुमार यादव याच्याविरुद्ध बलात्कार, अपहरण, धमकावणे आदी कलमाखाली आरोप ठेवले आहेत.