बलात्कार तसेच अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर त्वरित उपचार करावेत यासाठी दिल्लीतील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना उच्च न्यायालयाने गुरुवारी निर्देश जारी केले.
दिल्ली – बलात्कार तसेच अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर त्वरित उपचार करावेत यासाठी दिल्लीतील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना उच्च न्यायालयाने गुरुवारी निर्देश जारी केले. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांनी कोणत्याही प्रकारची टाळाटाळ करु नये असेही या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.
दिल्लीतील सामूहिक बलात्कार घटनेतील पिडित मुलगी आणि तिच्या मित्राला घटनेनंतरही एक तास कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर निर्देश जारी करताना मुख्य न्यायाधीश मुरगनसेन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. रुग्णालयांनी अशा व्यक्तींवर किंवा महिलांवर त्वरित उपचार करावेत. जेणेकरुन पुढील कायदेशीर कारवाई करताना कोणत्याही प्रकारचा अडसर येणार नाही.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी गुरुवारी नवा स्टेटस रिपोर्ट न्यायालयापुढे सादर केला. या स्टेट्स रिपोर्टमध्ये पीसीआर व्हॅनमध्ये ड्यूटीवर असलेल्या पोलिसांची जबाबदारी आणि कर्तव्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे.