प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दहशतवाद्यांकडून होणा-या हल्ल्यांची शक्यता पाहता एनआयएस, एटीएस, गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेनी देशव्यापी मोहीम हाती घेतली असून पहिल्याच दिवशी १४ जणांना अटक करण्यात आली आहे.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/09/terrorist.jpg)
नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दहशतवाद्यांकडून होणा-या हल्ल्यांची शक्यता पाहता एनआयएस, एटीएस, गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेनी देशव्यापी मोहीम हाती घेतली असून पहिल्याच दिवशी १४ जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटेपासून विविध राज्यांमधील पोलीस दलांशी समन्वय राखत छाप्यांची मोहीम पार पाडण्यात आली.
मुदब्बीर शेख हा ठाण्यातील मुंब्रा परिसरात वास्तव्याला होता. त्याचा यापुर्वी इंडियन मुजाहिदीनशी संबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळते. मुंबईच्या माझगाव भागातून महम्मद हुसेन याला अटक करण्यात आली असून तो व्यावसायिक असल्याचे समजते. त्यानंतर इतर तरुणांपर्यंत पोलीस पोहोचले. हे सर्वजण ‘जानूद-उल खलिफा-ए- हिंद’ या दहशतवादी संघटनेशी संपर्कात होते. यांच्याकडून पोलिसांनी मोबाईल, काही स्फोटके बॅटरी जप्त केले आहे.
राज्यांतील १४ इसिस समर्थकांना आणि कर्नाटकमध्ये अल-कायदाशी संबंधित सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याने खळबळ उडाली. महाराष्ट्र,तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आणि उत्तर प्रदेशासह सात राज्यांमध्ये एकाचवेळी ठापे टाकल्याने या १४ जणांना अटक करण्यात आले दरम्यान दिल्ली, पंजाब, मुंबईसह देशव्यापी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विविध राज्यांमधील पोलीस दलांशी समन्वय राखत छाप्यांची मोहीम पार पाडण्यात आली. या सर्व १४ जणांना दिल्लीत चौकशीसाठी नेण्यात आले आहे.