पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारतासह इतर देशांतील दिग्गज खेळाडू उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली- पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या ‘तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाने सर्वाधिक जागा पटकावून आघाडी घेतल्याने इम्रान खान यांचा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारतासह इतर देशांतील दिग्गज खेळाडू उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतातून सुनील गावसकर आणि कपिल देव यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचे रॉचे प्रमुख ए. एस. दुलत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
इम्रान खान यांचा विजय झाल्यानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनील गावसकर यांनी त्यांचे अभिनंदनही केले होते. त्याचबरोबर इम्रान पंतप्रधान झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारतील अशी आशाही कपिल देव यांनी व्यक्त केली होती.