जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या क्रीडापटूंनी निराशाजनक सुरुवात केली.
बीजिंग – जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या क्रीडापटूंनी निराशाजनक सुरुवात केली. दुस-या दिवशी गोळाफेकीत माजी आशियाई विजेता इंदरजीत सिंग ११व्या स्थानी फेकला गेला. अंतिम फेरीत त्याला १९.५२ मीटर गोळाफेक करता आली. मात्र पात्रता फेरीतील तिस-या प्रयत्नातील २०.४७ मीटर गोळाफेकीमुळे इंदरजीतने अंतिम फेरी गाठली.
जागतिक स्पर्धेत ‘फायनल’साठी पात्र ठरलेला तो भारताचा पहिला गोळाफेकपटू ठरला. इंदरजीतची सवरेत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी २०.६५ मीटर इतकी आहे. त्याच्या आसपास त्याला पोहोचता आले नाही. अमेरिकेच्या ज्यो कोवान्सने २१.९३ मीटर गोळाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
२० मीटर धावणे प्रकारात बलजिंदर सिंग १२वा आला. १:२१:४४ सेकंद ही यावेळची त्याची कामगिरी वैयक्तिक सवरेत्कृष्ट ठरली. गुरमीत सिंग (१:२५:४४ सेकंद) आणि चंदन सिंग (१:२५:२२ सेकंद) हे अनुक्रमे ३६ आणि ४२वे आले. युरोपियन चँपियन मिगेल अँजेल लोपेझने १:१९:१४ सेकंद अशी वेळ नोंदवत बाजी मारली. जागतिक स्पर्धेत १९९३ नंतर २० किमी चालणे प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा तो स्पेनचा पहिला धावपटू ठरला.
बोल्टचा दबदबा कायम
१०० मीटर धावणे प्रकारात विश्वविक्रमी जमैकाच्या उसेन बोल्टला कुणीच रोखू शकत नाही, हे बीजिंगमधील राष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी पुन्हा दिसून आले. ९:७९ सेकंद अशी वेळ नोंदवत त्याने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक पटकावले. पात्रता फेरीत पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तरी उपांत्य आणि अंतिम फेरीत बोल्टने चांगली वेळ नोंदवली. अमेरिकेचा जस्टिन गॅटलिनने (९.८० सेकंद) त्याला चांगली चुरस दिली. मात्र एका सेकंदाने बोल्टने बाजी मारली.