मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटमध्ये आघाडीवर असलेले ट्विटर आता युझर्सना इंटरनेटशिवाय आपली सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.मुंबई- ट्विटर युझर्सना लवकरच इंटरनेटशिवाय टि्वटरवरील अपडेट मिळणार आहेत. मायक्रो ब्लॉगिंगमध्ये आघाडीवर असलेल्या ट्विटर आणि U2opia मोबाईल या दोघांनी एकत्र येऊन ही संकल्पना आणली आहे. ट्विटर वापरणा-यांना आता इंटरनेटशिवायही ट्विटरवरील सध्या घडत असलेल्या घटनांची माहिती पाहता येणार आहे.
इंटरनेटशिवाय ट्विटर ही सुविधा पुढील वर्षातील सुरुवातीच्य्या महिन्यांमध्ये सुरु होणार आहे. युएसएसडी तंत्रज्ञानाच्या मदतीने ट्विटरचा वापर करता येईल. त्यासाठी युझर्सना दिला गेलेला कोड फक्त टाकायचा आहे. त्यानंतर युझर्स सध्या घडत असलेल्या घडामोडींची ट्विटरवरील माहिती मेसेजच्या स्वरुपात पाहू शकतील.
या आधी U2opia मोबाईलने फेसबुकसोबत इंटरनेटशिवाय फेसबुक ही संकल्पना आणली होती आणि त्याला युझर्सनी चांगला प्रतिसाद दिला होता.
U2opia मोबाईलची U2opia’s फोनेटविश सर्व्हिसची इंटरनेटशिवाय फेसबुक आणि गुगल चॅट ही सुविधा सध्या ११ दशलक्ष लोक वापरत आहेत. त्याचबरोबर ट्विटरचे सध्या २३० दशलक्ष इतके युझर्स आहेत. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटला असलेल्या लोकप्रियतेमुळेच ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे.
[EPSB]
उमेदवारांची माहिती मिळणार थेट फोनवर
विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवणा-या उमेदवारांची माहिती आता थेट मतदारांच्या फोनवर मिळणार आहे.
[/EPSB]