साध्या माणसांची तितकीच सरळ गोष्ट सांगणा-या ‘इंग्लिश विंग्लिश’ हा यशस्वी चित्रपट आता रोमानिया देशातही प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे
मुंबई – साध्या माणसांची तितकीच सरळ गोष्ट सांगणा-या ‘इंग्लिश विंग्लिश’ हा यशस्वी चित्रपट आता रोमानिया देशातही प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटालाभारताचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तब्बल १५ वर्षांनी बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणा-या श्रीदेवीच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला होता.
श्रीदेवीने ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपट रोमानियामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. २०१२ मध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. गौरी शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. यामध्ये श्रीदेवीसोबतच मेहदी नेब्बो, अदिल हुसैन आणि प्रिया आनंद यांच्याही भूमिका होत्या.
याआधी जून महिन्यात हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला होता. तिथेही चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता.