इंग्लड संघाचा फलंदाज जोनाथन ट्रॉट याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
लंडन – इंग्लड संघाचा फलंदाज जोनाथन ट्रॉट याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
नुकत्याच झालेल्या इंग्लड आणि वेस्ट इंडिज संघादरम्यानच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलामीवीर ट्रॉटला सहा डावांत केवळ ७२ धावा करता आल्या. ही मालिका १-१ ने बरोबरीत सुटली.
हा खरंच कठीण निर्णय होतो. मला नाही वाटत इंग्लडसाठी जसा खेळ व्हायला हवा तसा मी खेळलो. मला संघात पुन्हा संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. मात्र या संधीचा मी फायदा उचलू शकलो नाही याचे मला दुख आहे असे ट्रॉट म्हणाला.
२०१३-१४च्या अशेस मालिकेनंतर ट्रॉट संघाबाहेर होता. ट्रॉटने आठ वर्षांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत ५२ कसोटी, ६८ एकदिवसीय आणि सात टी२० सामने खेळले आहेत.