अभिनेत्री आलिया भट्टचे सामान्य ज्ञान सोशल मिडीयावर विनोदाचा विषय आहे. करण जोहरच्या टॉक शो मध्ये आलियाने सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांवर जी उत्तरे दिली होती.
अभिनेत्री आलिया भट्टचे सामान्य ज्ञान सोशल मिडीयावर विनोदाचा विषय आहे. करण जोहरच्या टॉक शो मध्ये आलियाने सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांवर जी उत्तरे दिली होती. त्यानंतर आलिया सोशल मिडियावर एक विनोदाचा विषय बनली.
आजही व्हॉटस अॅपवर आलियाच्या नावाने विनोदाचे संदेश फिरत असतात. अलीकडेच शाहरुख खानच्या ‘इंडिया पूछेगा सबसे शाना कौन?’ या कार्यक्रमात आलिया सहभागी झाली होती.
यावेळी आलियाची सामान्य ज्ञानावरुन फिरकी घेणा-या शाहरुखला मात्र तोंडघाशी पडावे लागले. जनरल नॉलेजच्या प्रश्नांवर आलियाच्या उत्तरांमधून नवी विनोद निर्मिती होईल हा शाहरुखचा अंदाज चुकला. उलट आलियाने तिला विचारलेल्या तीन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन शाहरुखलाच चकीत केले.
शाहरुखने आलियाला भारताच्या पंतप्रधानांचे नाव विचारले त्यावर आलियाने बरोबर उत्तर दिले. त्यानंतर तीने स्वत:च कठिण प्रश्न विचारण्याची मागणी केली. त्यावर शाहरुखने तिला दुस-या काही देशांच्या पंतप्रधांनाची नावे विचारली त्याचेही आलियाने अचूक उत्तर देत सेटवर सर्वांनाच धक्का दिला. निदान आलियाने आपल्या जनरल नॉलेजला गांर्भीयाने घेतल्याचे दिसून येते.