अभिनेत्री आलिया भट हिने ट्विटर वर ७० लाख फॉलोअर्सचा विक्रम केला आहे. यावर २२ वर्षीय आलियाने तीच्या चाहत्यांचे आभार मानले आहे.
मुंबई – अभिनेत्री आलिया भट हिने ट्विटर वर ७० लाख फॉलोअर्सचा विक्रम केला आहे. यावर २२ वर्षीय आलियाने तीच्या चाहत्यांचे आभार मानले आहे. तसेच त्यांना प्रेमाचे आलिंगन दिले आहे. मी उत्तम प्रकारचे काम करीन ज्यामुळे तुम्हाला माझा अभिमान वाटेल, असे तिने म्हटले आहे.
आलिया हिने २०१० साली ट्विटर सोशल मिडीया वर खाते सुरु केले होते. ती आता ‘उडता पंजाब’ आणि ‘कपुर ऑड सन्स’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
तसेच गौरी शिंदे दिग्दर्शित एका चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खान सोबत सुद्धा पडद्यावर झळकणार आहे.
And and and special thank you to the 7m love 😉 big huggggggg.. I shall work even harder today haha ❤️❤️⭐️hope I make you guys proud!!
— Alia Bhatt (@aliaa08) January 21, 2016