ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीने आयसीसी क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.
दुबई – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीने आयसीसी क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. विराटसह या यादीत टॉप १० मध्ये शिखर धवन आणि महेंद्रसिंग धोनीचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताचे नेतृत्व करत असलेला विराट ८६२ गुणांसह दुस-या स्थानी आहे. तर ८८७ गुणांसह दक्षिण आफ्रिकेचा एबीडे विलियर्स अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खराब प्रदर्शन केलेला शिखर धवन या क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे. तर धोनी १० व्या स्थानी आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा हे दोनच खेळाडू आयसीसीच्या क्रमवारीत टॉप १० मध्ये आहेत. भुवनेश्वर आठव्या स्थानी आहे तर जडेजा नवव्या स्थानी आहे.
येत्या १६ तारखेपासून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत दरम्यान सात एकदिवसीय सामन्यांची तिरंगी मालिका होत आहे. त्यानंतर पुढील महिन्यात न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय विश्नचषक स्पर्धा रंगणार आहे.