मंगळावर मानवाची वस्ती होईल तेव्हा होईल तोपर्यंत तुम्ही तुमचे नाव तरी मंगळ ग्रहावर पाठवू शकता.
वॉशिंग्टन- भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान पाठवून नवा इतिहास घडवला. भविष्यातील मानवी वस्तीम्हणून मंगळाकडे पाहिले जाते. त्यामुळे जगातील सर्व प्रमुख अंतराळ संशोधन संस्थांचे लक्ष मंगळावर आहे. अर्थात मंगळावर जाण्यासाठी अजून किमान ४० ते ५० वर्षे लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळावर नेमकी कधी मानवी वस्ती होईल आणि आपल्याला तेथे रहायला मिळेल की नाही याबद्दल ठामपणे काहीच सांगता येत नाही. यामुळे कदाचीत अनेकांना मंगळवर जाता देखील येणार नाही. पण तुम्ही निराश होण्याचे कारण नाही, जरी तुम्हाला मंगळावर जाता नाही आले तर आज तुम्ही स्वतःचे नाव मंगळावर पाठवू शकता.
अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीने पाठवण्यात येणा-या यानामध्ये(Orion mission) नावाचा समावेश करण्यासाठी नासाने जगभरातील नागरिकांना आपली नावे पाठवण्यास सांगितले आहे. नासाच्या वतीने हे याना चार डिसेंबर रोजी मंगळावर पाठवण्यात येणार आहे. या यानासोबत पाठवण्यात येणा-या मायक्रोचीपमध्ये आतापर्यंत दोन लाख ८० हजार ४२९ नागरिकांना नावे पाठवली आहेत.
विशेष म्हणजे जगभरातील तब्बल दोन लाख ८० हजार नागरिकांनी मंगळावर पाठवण्यात येणा-या मायक्रोचीपमध्ये आपल्या नावाचा समावेश होण्यासाठी नोंदणी देखील केली आहे. यात २१ हजार भारतीयांचा समावेश आहे.
यामध्ये सर्वाधिक नावे अमेरिकेतील नागरिकांना पाठवली आहेत. अमेरिकेतील एक लाख १३ हजार १२१ नागरिकांना आपली नावे दिली आहेत. तर भारतातील २१ हजार ७२९ नागरिकांना आपली नावे पाठवली आहेत.
याशिवाय ब्रिटमधील २२ हजार ४९१, फिलिपिन्समधील नऊ हजार ८६९, कॅनडामधील सात हजार ७६०, चीनमधील १ हजार ८२८ तर पाकिस्तानमधील एक हजार ६२० जणांनी आपली नावे दिली आहेत. अमेरिकेच्या चलनातील दहा सेंट आकाराच्या मायक्रोचीपद्वारे ही नावे मंगळ ग्रहावर पाठवण्यात येणार आहेत. सर्वाधिक नावे पाठवण्यामध्ये भारत तिस-या क्रमांकावर आहे.
जर तुम्हालाही तुमचे नाव अंतराळात पाठवायचे असेल तर येथे क्लिक करा. नासाच्या नाव पाठवण्याच्या वेबसाइटवर गेल्यानंतर तुमचे नाव, आडनाव, देश, पोस्टर पिन कोड आणि ई-मेल आदी तपशील विचारला जाईल. ही माहिती सादर केल्यानंतर तुम्हाला या यानातील बोर्डिंग पास देखील दिला जाणार आहे. इतक नव्हे तर यापुढे होणा-या मोहिमांमध्ये तुमचा समावेश केला जाणार आहे.
नाव पाठवण्याची अखेरची मुदत ३१ ऑक्टोबर २०१४ आहे. त्यामुळे अंतराळात अर्थात मंगळावर नाव पाठवण्याची ही संधी सोडू नका. भविष्यात जेव्हा मंगळावर वस्ती होईल तेव्हा तेथे पोहचणा-या पिढीला तुमची नावे नक्की वाचण्यास मिळतील.