आम आदमी पक्षाची निवडणूक आयोगाकडील नोंदणी रद्द करावी या मागणीसाठी दाखल झालेली जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाची निवडणूक आयोगाकडील नोंदणी रद्द करावी या मागणीसाठी दाखल झालेली जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.
आम आदमी पक्षाने नोंदणीसाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याने त्यांची नोंदणी रद्द करावी अशी याचिकाकर्त्याने मागणी केली होती. न्यायमूर्ती जी. रोहिणी यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.
नोंदणी करताना झालेल्या अनियमिततांची चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. आपने नोंदणी करताना अशोक चक्राचा वापर कसा केला ? हे संविधानाचे उल्लंघन आहे. कोणीही स्वत:हासाठी असा राष्ट्रीय मानचिन्हांचा वापर करु शकत नाही असे हंस राज जैन यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटले होते.