सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा डोंगरमार्ग आहे. त्यात तीन ते चार किल्ले आहेत. त्यातलाच एक ‘किल्ले रोहिडा’. या किल्ल्याची निर्मिती यादवकालीन आहे. भोर या गावाजवळ हा किल्ला आहे. त्याची उंची ३६६० फूट इतकी आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा डोंगरमार्ग आहे. त्यात तीन ते चार किल्ले आहेत. त्यातलाच एक ‘किल्ले रोहिडा’. या किल्ल्याची निर्मिती यादवकालीन आहे. भोर या गावाजवळ हा किल्ला आहे. त्याची उंची ३६६० फूट इतकी आहे. या किल्ल्यावरच्या तिस-या दरवाजावर असणा-या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशाहाने या किल्ल्याची दुरुस्ती केली, असं समजतं. या गडावर ब-याच प्रमाणात कोरीवकाम आढळतं. दोन्ही बाजूंना हत्तीचं शिर कोरण्यात आलं आहे. किल्ल्यावर रोहिडमल्ल ऊर्फ भैरोबाचं मंदिर आहे. मंदिरासमोर पाण्याची लहानशी टाकी, दीपमाळ आणि चौकोनी थडगी आहेत. रोहिडाचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्नेयेस शिकवले बुरूज, पश्चिमेला पाटणे आणि दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज, पूर्वेला फत्ते बुरूज आणि सदरेचा बुरूज असे एकूण बुरूज आहेत. आपले गड-किल्ले