सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘आपला माणूस’ या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत आहेत.
‘नटसम्राटनंतर, मी काहीतरी विशेष माझ्याकडे येण्यासाठी वाट पाहत होतो, एखादे असे पात्र जे ऐकताच क्षणी मला आवडेल आणि मारुती नागरगोजेमध्ये मला ते सापडले’. अशी प्रतिक्रिया दिली आहे आपल्या माणसाने, अर्थातच नाना पाटेकर यांनी. निमित्त होते सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगचे.
वायाकॉम १८ मोशन पिक्र्स प्रस्तुत व अजय देवगण निर्मित ‘आपला माणूस’च्या टीजरला यापूर्वीच १.५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. नाना पाटेकर, सुमित राघवन आणि ईरावती हर्षे या कलाकारांसह नुकत्याच झालेल्या एका समारंभात निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला.
आपला माणूस येत्या ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
चित्रपटाचा ट्रेलर येथे पहा…