बॉलीवूड अभिनेता आमिर खान याने आपण ‘आप’ किंवा अन्य कोणत्याही पक्षाला पाठिंबा देत नसल्याचे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे.
मुंबई – बॉलीवूड अभिनेता आमिर खान याने आपण आम आदमी पक्ष किंवा अन्य कोणत्याही पक्षाला पाठिंबा देत नसल्याचे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे. ‘आप’च्या प्रचारसभेदरम्यान त्याचे छायाचित्र वापरण्यात येत असल्याचे आमीरच्या निर्दशनास आल्यानंतर त्याने आयोगाला पत्र लिहिले आहे.
निवडणुकीसाठी आमिर खान ‘नॅशनल आयकॉन’
आपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या पोस्टरमध्ये आमिरचे छायाचित्र वापरुन आमिर खानचा ‘आप’ला पाठिंबा आहे असे ट्विटरवर लिहिले होते. या संदर्भात आमिरने आपण कोणत्याच राजकीय पक्षाला पाठिंबा देत नसल्याचे पत्राद्वारे आयोगाला कळवले आहे.
पहिल्याच दिवसापासून आमिरने आपण कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर तो राजकीय पक्षाच्या प्रचारसभेत सहभागी नाही असे आमिरच्या प्रवक्त्यांनी या वेळी सांगितले.
याआधी आयोगाने येत्या निवडणुकीसाठी ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून आमिर खानची निवड केली आहे.