दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी आम आदमी पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या.
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी आम आदमी पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या.
आपमध्ये कुठलीही धुसफूस राहिली नसून, सर्व काही सुरळीत आलबेल आहे असे केजरीवाल यांनी सांगितले.
योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, आनंद कुमार आणि अजित झा यांची शनिवारी आपमधून हकालपट्टी केल्यानंतर आपने रविवारी अरविंद केजरीवाल यांचा राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीतील ४५ मिनिटांच्या भाषणाचा व्हिडीओ प्रसिध्द केला.
माझ्याशी विश्वासघात झाला. माझ्या पाठित खंजीर खुपसला अशी विधाने या भाषणात असून, सर्वात शेवटी केजरीवालांनी माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एकाला निवडा असे आवाहन राष्ट्रीय कार्यकारीणीच्या सदस्यांना केले.
काटछाट करुन हा व्हिडीओ प्रसिध्द करण्यात आला आहे असा आरोप यादव आणि भूषण यांच्या समर्थकांनी केला आहे. सिंगापूरपासून प्रेरणा घेऊन दिल्लीची पाणी समस्या सोडवू असे आश्वासनही केजरीवालांनी आपल्या भाषणात दिले.