स्तंभलेखिका वर्षा भोसले आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी सायंकाळी त्यांचा भाऊ आनंद भोसले यांचा जबाब नोंदवला.
मुंबई- स्तंभलेखिका वर्षा भोसले आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी सायंकाळी त्यांचा भाऊ आनंद भोसले यांचा जबाब नोंदवला. या जबाबात आनंद यांनी पिस्तुलासंदर्भात आणि कौटुंबीक माहिती दिल्याचे समजते. आशा भोसले यांनी जी माहिती पोलिसांना दिली तशीच माहिती आनंद यांनीही जबाबात दिली आहे. गरज पडल्यास पुन्हा त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.
आशा भोसले यांच्या घरातून ३० वर्षापूर्वी जे पिस्तुल चोरीला गेले होते, त्याबाबतची कागदपत्रेही तपासणीसाठी मुंबई पोलिसांच्या शस्त्र विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत. तसेच पोलिस न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या बॅलेस्टिक विभागाच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरणार आहे.
सिंगापुर येथे असताना वर्षाच्या आत्महत्येची बातमी समजली. पण विमानाचे तिकीट उपलब्ध नसल्याने आपण मुंबईत येऊ शकलो नाही, असे आनंद यांनी जबाबात म्हटल्याचे समजते.
[EPSB]
जबाब नोंदवण्यासाठी आनंद यांची टाळाटाळ?
स्तंभलेखिका वर्षा भोसले यांच्या आत्महत्याप्रकरणात पोलिसांना अजूनही त्यांचा भाऊ आनंद भोसले यांचा जबाब नोंदवता आलेला नाही.
[/EPSB]