जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला शनिवारी ताल स्मृती बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत माजी जगज्जेता रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली.
मॉस्को- जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला शनिवारी ताल स्मृती बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत माजी जगज्जेता रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली.
पांढरी मोहरी घेऊन खेळताना आनंदने निम्झो इंडियन डिफेन्सचा सामना केला. दोघांचेही प्रत्येकी दीड तास बाकी होते. मात्र दोघांनीही जलद चाली खेळल्या. तरीदेखील ३० चालींनंतर दोघांनी बरोबरी मान्य केली.
स्पर्धेत आता रविवारी (२३ जून) होणा-या नवव्या म्हणजे शेवटच्या फेरीत आनंदची लढत रशियाच्या सर्जी कार्याकिनशी होणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत आनंदला एकच विजय नोंदवता आला आहे.