जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि आव्हानवीर मॅग्नस कार्लसन यांच्यातील जगज्जेतेपदाच्या लढतीतील चौथा डावही बुधवारी ६४ चालींनंतर बरोबरीत सुटला.
चेन्नई- जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि आव्हानवीर मॅग्नस कार्लसन यांच्यातील जगज्जेतेपदाच्या लढतीतील चौथा डावही बुधवारी ६४ चालींनंतर बरोबरीत सुटला. तब्बल सहा तास चाललेल्या लढतीत दोघांनी खूप चुका केल्या तरी एकमेकांना चांगले रोखलेही.
पांढ-या मोह-यांनिशी खेळताना आनंदने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला तरी डावाच्या शेवटच्या टप्प्यात तो दडपणाखाली जाणवला. दोघांनी सुरुवातीच्या चाली झटपट रचल्या. आनंदने राजापुढील प्यादे पुढे सरकवल्यानंतर कार्लसनने बर्लिन डिफेन्स प्रकाराने त्याला उत्तर दिले. १८व्या चालीला आनंदने प्यादाचा बळी दिला. त्या बदल्यात त्याला कार्लसनच्या राजावर दडपण आणायचे होते. आनंदला प्याद्याच्या बदल्यात पुरेशी भरपाई मिळाली नाही. दोघांनीही डावादरम्यान खूप चुका केल्या. पण अखेरीस डाव रंगतदार झाला.
विश्रांती
जगज्जेतेपदाच्या लढतीत बुधवारी (१४ नोव्हेंबर) विश्रांती आहे. त्यानंतर गुरुवारी पाचव्या डावात कार्लसन पांढ-या मोह-यांनिशी खेळेल.