अनुदानित सिलिंडरच्या खरेदीसाठी आधार कार्डची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी लोकसभेत सांगितले.
नवी दिल्ली– अनुदानित सिलिंडरच्या खरेदीसाठी आधार कार्डची आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केले. आधार कार्डशी संलग्न असलेल्या खात्याचा सिलिंडर वितरणाशी असलेला संबंध तोडण्याचा आदेश येत्या आठवड्याभरात काढण्यात येईल, असेही केंद्र सरकारने सांगितले
केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी लोकसभेत गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ही माहिती दिली. अनुदानित सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आली आहे, असे मोईलींनी स्पष्ट केले.
अनुदानित सिलिंडरचे अनुदान ग्राहकांच्या खात्यात जमा करताना काही अडचणी येत होत्या. यामुळेच ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मोईली म्हणाले. त्यामुळे आता ग्राहकांना आधार कार्डाशिवाय थेट एजन्सीकडून गॅस सिलिंडर खरेदी करता येणार आहे.