आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात वाढ झाल्याने सरकारने पेट्रोलच्या दरात ३५ पैशांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली- नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून दरवाढीच्या मालिकेने अद्याप सर्वसामान्य जनतेची पाठ सोडलेली नाही. डिझेल, गॅस आणि रेल्वे दरवाढीनंतर आता पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. प्रमुख पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोलच्या प्रतिलिटर दरात ३५ पैशांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलसाठी ७४.६८ रुपये मोजावे लागणार आहेत. तर दिल्लीत पेट्रोलसाठी ६७. ५६ रुपये मोजावे लागणार आहेत. अर्थात विविध शहरात स्थानीक करांमुळे प्रत्यक्षात ही दरवाढ ३५ पैशांपेक्षा अधिक सहन करावी लागणार आहे. नोव्हेंबर २०११नंतर प्रथमच पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पेट्रोलच्या दरात अनुक्रमे ५६ आणि ९५ पैशांनी कपात करण्यात आली होती.
[EPSB]
केळकर समिती अहवाल काय सांगतो?
वित्तीय तुटीला वेसण घालण्यासाठी सरकारला विविध कल्याणकारी योजनांवरील खर्चाला आवर घालावा यासाठी कडवट निर्णय घ्यावे लागणार आहेत.
[/EPSB]