मोदी सरकारने १० लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणा-या ग्राहकांना या पुढे स्वयंपाकाच्या गॅससाठी सबसिडी न देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधीच इंधनाचे दर कमी असलेल्या मोदी सरकारला मोठा फायदा होणार आहे. हा फायदा नेमका किती कोटींचा असेल त्याचा आकडा आताच सांगता येणारा नाही. गेल्या काही वर्षात घरगुती स्वयंपाकाचा गॅस महाग होत गेला आहे. त्यामुळे आता तो गरिबांसाठी आणि गरजूंसाठी अनुदानित स्वरूपात ४५९ रुपयांना मिळतो. वर्षाला बारा अनुदानित गॅस देण्याची सवलत अशा कुटुंबांना देण्यात आली होती. त्यापेक्षा जास्त सिलिंडर्स हवी असतील तर त्यासाठी बाजारभावाने ६२० रुपयाने सिलिंडर्स घ्यावी लागतात. मुळात बाजारभावाने मिळणा-या आणि अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये फक्त १६१ रुपयांचा फरक आहे. आज देशात महागाईने सर्वसामान्य एवढा पोळलेला आहे. रुपयाची किंमत घसरली आहे. त्यामुळे घराबाहेर काही किरकोळ खरेदीसाठी निघालेल्या व्यक्तीला शंभराची नोट मोडून घरात परतावे लागते. सर्वसामान्यांची शंभराच्या नोटीबाबत अशी अवस्था आहे. मात्र, ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा जास्त आहे अशांना या पुढे फक्त १६१ रुपये जास्त देऊन गॅस घ्यावा लागणार आहे. त्यांच्यासाठी एलपीजी गॅस आधीही महाग नव्हता आणि आताही असणार नाही. महिन्याला ८३ हजारांच्या पुढे ज्यांचा पगार किंवा मासिक कमाई आहे, अशा ग्राहकांसाठी एका सिलिंडर्समागे १६१ रुपये जास्त भरणे काही मोठी गोष्ट नाही. देशात १६ कोटी ३५ लाख सिलिंडर्स ग्राहक आहेत. त्यापैकी किती अनुदानित गॅस ग्राहक आहेत हे जसे माहीत नाही तसे आताच्या भाजपाच्या निर्णयामुळे १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न गटात किती ग्राहक आहेत, हे समोर आलेले नाही. अशा उच्चमध्यमवर्गीच्या सिलिंडर्सवरील सवलत बंद करणे, योग्य असले तरी त्यामुळे होणा-या बचतीचा फायदा गरीब आणि गरजू गॅस सिलिंडर्सधारकांना होईल का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधीही उच्चमध्यमवर्गीय आणि श्रीमंतांनी सबसिडीतील गॅस वापरू नये, आपली सबसिडी कायमस्वरूपी देऊन टाकावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ५७ लाख ग्राहकांनी आपली गॅस सबसिडी परत केली होती. त्यामुळे सरकारला फायदा झाला होता. आता तर भाजपाने सक्ती केली आहे; पण ज्यांना एलपीजी गॅस अनुदानित स्वरूपात मिळतो त्यांच्या अनुदानात वाढ करण्याची मानसिकता भाजपा सरकारकडे नाही. जगात इंधनाचे दर आज घसरलेले आहेत, एकीकडे लोक स्वच्छेने आपली सबसिडी सोडत आहेत, आणि त्यावेळी उच्च मध्यम आणि श्रीमंतांवर ती सोडण्यासाठी सक्ती केली जात आहे पण या सोडलेल्या सबसिडीचा फायदा लोकांना मिळत नाही. सर्वसामान्यांकडे उत्पन्नाची साधने खूप कमी असतात. जी असतात त्यात त्यांच्या महिन्याचा जमा-खर्चाचा ताळमेल बसत नसतो. अशा वेळी सबसिडी जर गरजूंना मिळाली तर महागाईच्या दिवसात त्यांना दिलासा मिळेल. गॅस सिलिंडर्सची टंचाई देशभर पाहायला मिळते. ती टंचाई दूर करणेही आवश्यक आहे. खासदारांचा पगार आता वाढणार आहे. तो महिन्याला तीन लाखांच्या आसपास जाईल. त्यामुळे देशभरातील खासदार हे गॅसवरील सबसिडी सोडतील का? त्यात २०१४मध्ये निवडून आलेल्या खासदारांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त खासदार हे कोटय़ाधीश आहेत. त्यांचे अनेक लघु आणि मध्यम उद्योगधंदे आहेत. त्यांनी या आधी गॅसवरील सबसिडी सोडली नाही ते त्यांच्या पगारात वाढ केल्यानंतर ही सबसिडी सोडायला तयार होतील का? मोदी त्यासाठी वेगळे आवाहन करतील का? की, फक्त देशवासीयांनाच उपदेशाचे, परोपकाराचे डोस पाजत बसतील? दिल्लीत मोदी सरकारला चितपट करणारे अरविंद केजरीवाल महिन्याला दोन लाखांपेक्षा जास्त पगार घेणा-या आमदारांना सबसिडी सोडण्यास सांगतील का? गरजूंच्या सबसिडीत वाढ होईल का?
आता गरजूंची गॅस सबसिडी वाढवा!
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on