समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याने ११वीच्या विद्यार्थ्याला अटक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याने ११वीच्या विद्यार्थ्याला अटक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
न्यायालयाने या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली असून चार आठवड्यांत नोटीशीवर उत्तर पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
आझम खान यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने बरैली येथील ११वीत शिकणा-या विद्यार्थ्याला सोमवारी अटक करण्यात आली होती. या मुलाविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम६६अ, कलम १५३अ, ५०४ आणि ५०५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याला न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली होती.