“दादी माँ हो गयी में”, अशा शब्दात १६व्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सभापतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त केल्या.
नवी दिल्ली- “दादी माँ हो गयी में”, अशा शब्दात १६व्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सभापतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त केल्या.
हरयाणातील २६ वर्षीय खासदार दुष्यंत चौटाला यांनी महाजन यांचे अभिनंदन करताना त्या प्रथमच लोकसभेवर निवडूण आलेल्या सदस्यांना अधिक वेळ देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
पहा व्हिडिओ- लोकसभेच्या दुस-या महिला सभापती
सुमित्रा महाजन यांनी आपले पणजोबा आणि माजी उपपंतप्रदान चौधरी देवीलाल, आजोबा ओमप्रकास चौटाला तसेच वडील अजय चौटाला यांच्यासोबत काम केल्याचे दुष्यंत यांनी सांगितले. त्यांच्या या अनुभवाचा आम्हाला नक्की उपयोग होईल असेही ते म्हणाले.
यावर “आजीबाई झाले मी” अशी प्रतिक्रिया सुमित्रा महाजन यांनी दिली.
सुमित्रा महाजन यांनी इंदोर लोकसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विजय मिळवला आहे. त्यांनी १९८९मध्ये सर्वप्रथम लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. महाजन यांची सभापती म्हणून निवड झाल्यानंतर माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग, १६व्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे आदींनी त्यांचे अभिनंदन केले. तेलगू देसम पक्षाने सुमित्रा महाजन यांचे अभिनंदन केले. तसचे ताई या सर्वात प्रामाणिक राजकारणी असल्याचे म्हटले आहे.
[EPSB]
‘कोकणकन्या’ सुमित्रा महाजन लोकसभेच्या सभापती »
सोळाव्या लोकसभेच्या सभापतीपदी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. …
[/EPSB]