आग्राजवळच्या सुर सरोवर पक्षी विहार (कीठम) जंगलात लागलेल्या वणव्यात सर्प, विंचू, प्राणी आणि अन्य पक्षांचा होरपळून मृत्यू झाला.
आग्रा- आग्राजवळच्या सुर सरोवर पक्षी विहार (कीठम) जंगलात लागलेल्या वणव्यात सर्प, विंचू, प्राणी आणि अन्य पक्षांचा होरपळून मृत्यू झाला.
पक्षी विहार जंगलात उच्च दाबाची विजेची तार तुटल्याने भीषण आग लागली. सुकलेले गवत आणि पालापाचोळ्यामुळे या आगीचे वणव्यात रुपांतर झाले.
या आगीच्या वणव्यात सर्प, विंचू, अजगर, नाग, नील गाय, ससे आणि अन्य पक्षांचा होरपळून व गुदमरुन मृत्यू झाला. आगीचा हा वणवा जवळपास तीन किलोमीटर परिसरात पसरला होता.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचण्याआधी वन विभागाच्या कर्मचा-यांनी आणि गावातील लोकांनी आग विझवण्यास सुरुवात केली होती. परंतु काही केल्या ही आग विझली जात नव्हती.
ही आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या अधिका-यांना जंगलात प्रवेश करण्यासाठी रस्ता मिळत नव्हता. त्यानंतर अग्निशमन दलाकडचे पाणी संपल्याने आग विझवण्यास आणखी उशिर झाल्याचे सांगण्यात आले.