‘मदर्स डे’ साजरा करण्याचा उत्साह जोरात आहे. अनेक शुभेच्छापत्रांनी बाजारपेठ सजलीय. आईला भेटवस्तू म्हणून काय काय घ्यावं याचे सल्ले देण्यासाठी वर्तमानपत्रं, रेडियो एफएम चॅनेल्स, टीव्ही वाहिन्यांमध्ये चुरस लागली आहे.
‘मदर्स डे’ साजरा करण्याचा उत्साह जोरात आहे. अनेक शुभेच्छापत्रांनी बाजारपेठ सजलीय. आईला भेटवस्तू म्हणून काय काय घ्यावं याचे सल्ले देण्यासाठी वर्तमानपत्रं, रेडियो एफएम चॅनेल्स, टीव्ही वाहिन्यांमध्ये चुरस लागली आहे. साडया, गाऊनपासून ते दागिन्यांपर्यंत लोकांनी आपल्या आईसाठी खरेदी करावी म्हणून उत्सवी वातावरण आहे. आईला द्यायच्या भेटवस्तूंच्या विचारांतून थोडासा वेळ काढून जरा डोकं खाजवा आणि खरं सांगा.. तुम्ही तुमच्या आईला पत्र लिहून किती र्वष झाली? आईला शेवटचं पत्र कधी लिहिलं होतं?
पटकन आठवणार नाही. होय ना? आठवलं तरी धूसर होस्टेलच्या काळातलं किंवा कुठे तरी प्रवासातल्या रात्री लिहिलेलं एखादं पत्र असू शकेल. लहानपणी ‘आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’ हा खेळ बरेच लोक खेळले असतील. पण पूर्वी कधी आपल्याच नागमोडी वळणाच्या पेन्सिलीने लिहिलेल्या हस्ताक्षरातलं आईसाठीचं पत्र आपल्यालाच परत सापडलं तर? तो होणारा आनंद अगदी अमाप असू शकेल. ‘मदर्स डे’च्या निमित्ताने आईची पेटी शोधा. त्या पेटीत ते पत्र आवर्जून सापडेल.
पण हल्ली आईचं पत्र खरंच हरवलंय.
या ई-मेल आणि मोबाइलच्या जमान्यात आईला पत्र लिहिण्याचं प्रयोजनच नाहीसं झालंय. अगदी आईची आठवण झाली की आपण फोन उचलतो आणि तिच्याशी बोलतो. ब-याचदा काहीतरी कामाचंच किंवा सल्ल्याचं. प्रयोजन जरी निघालं तरी पत्र लिहिण्याएवढा वेळ हल्ली असतो कुणाला? आणि आई पत्र लिहिण्याइतकी महत्त्वाची वाटते का, हाही प्रश्न उपस्थित करावा लागेल.
आईला पत्र लिहिलं काय किंवा नाही लिहिलं काय, तसा फरक पडत नाही. तिची माया काही कमी होत नसते. तुमच्या मोठ्ठय़ा शुभेच्छापत्रानेही ती हरखून जाते. एखादं गिफ्ट तिच्या पदरात टाकलं तर मोहरून जाते. पण तरीही तिला खरं गहिवरून येईल ते तुमच्या दोन शब्दांच्या शेअरिंगने. आईच्या गळ्यात हात टाकून तिच्याशी थोडय़ा गप्पा मारायला वेळ काढा आणि त्याहूनही थोडा अधिक वेळ काढून कागदावर तिच्यासाठी चार ओळी खरडाच.
खूप आतून मनापासून. कुठलाही औपचारिक मायना मनाशी न ठेवता. ती माऊली तो कागदाचा चिठोरा आयुष्यभर हृदयाशी लावून ठेवील. कधी वाटलंच एकाकी तर तो काढून भिजल्या डोळ्यांनी पुन:पुन्हा वाचून काढेल. तिच्या आनंदासाठी एवढं करायला काहीच हरकत नाही. तिला हे सरप्राइज नक्की आवडेल!
आईला द्या संगीतमय शुभेच्छा!
सध्याच्या ‘डेज्’च्या जमान्यात भेटवस्तूंची खरेदी आपणासाठी काही नवीन नाही. मात्र आता या डेज्चं निमित्त साधून अनेकविविध कार्यक्रमांनी, कॉन्सर्ट्सनी मॉलमधली गर्दीही आकर्षित होते. नेमकं हीच मानसिकता हेरून जवळच आलेल्या ‘मदर्स डे’च्या निमित्ताने देशभरातील इनऑरबिट, हाय स्ट्रीट्स फिनिक्स, इन्फिनीटी अशा काही मॉल्समध्ये ११ व १२ मे रोजी एका खास संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, ‘फिशर प्राईस’ या कंपनीने!
या कार्यक्रमात ‘आई’विषयीची गाणी सादर केली जाणार आहेत, तीही एका खास शैलीत. म्हणजे आपण आपल्या आईविषयीचा संदेश कार्यक्रम सादरकर्त्यांपर्यंत पोहोचवायचा. त्या संदेशाशी मिळतंजुळतं गाणं फिशर प्राईसचा ‘लाइव्ह बॅण्ड’ खास आपल्या आईसाठी सादर करणार. आहे की नाही गंमत! पण या वेळी तुमची आई तुमच्या सोबत असेल तर..
मग या कार्यक्रमाचं औचित्य अजिबात सोडू नका. मदर्स डेच्या दिवशी आईला नक्की मॉलमध्ये घेऊन जा, आणि ‘फिशर प्राईस’च्या संगीतमय कार्यक्रमात सहभागी व्हा. आतापर्यंत कधी आईलाही तिच्याविषयी नेमकं काय वाटतं, हे सांगता आलं नसेल तर या कार्यक्रमाचा रंगमंच त्याचं निमित्त ठरू द्या.. तिलाही यातून नक्कीच एक वेगळा आनंद गवसेल.. अजून एक ‘सरप्राईज’ म्हणजे, काही ‘लकी’ मंडळींच्या थेट घरी जाऊनही हा बॅण्ड त्या घरातील ‘आई’साठी छानसं गाणं सादर करणार आहे. तसंच मुंबईतील ‘हाय स्ट्रीट्स फिनिक्स’ इथे ११ मे रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत ‘रेडिओ सिटी’ ही रेडिओ वाहिनीही या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे.