अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लडने वर्चस्व गाजवले असले तरी दुस-या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमानांना पराभवाचा धक्का देत हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले.
लंडन – अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लडने वर्चस्व गाजवले असले तरी दुस-या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमानांना पराभवाचा धक्का देत हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाने दुस-या सामन्यात इंग्लडवर ४०५ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ ने बरोबरी केली.
दुस-या डावात इंग्लडसमोर विजयासाठी ५०९ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने ठेवले होते. यास प्रत्युत्तर देताना इंग्लडचा संपूर्ण डाव १०३ धावांवर संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने मोठा विजय मिळवला. मिशेल जॉन्सनचे तीन बळी आणि जोश हेझलवूड आणि नथन लॉयनच्या प्रत्येकी दोन बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा शानदार विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५६६ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव ऑस्ट्रेलियाने ३१२ धावांवर संपुष्टात आणला. दुस-या डावात ऑस्ट्रेलियाने २५४ धावांवर डाव घोषित केला आणि यजमानांना विजयासाठी ५१९ धावांचे भलेमोठे आव्हान दिले. मात्र या आव्हानाला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा डाव अवघ्या १०३ धावांवर आटोपला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) – आठ बाद ५६६
इंग्लड (पहिला डाव) – सर्वबाद ३१२
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) – दोन बाद २५४ घोषित
इंग्लड (दुसरा डाव) – सर्व बाद १०३
सामनावीर – स्टीव्हन स्मिथ(ऑस्ट्रेलिया)