अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानपत्र, मानचिन्ह देऊन नरीमन पॉइंट (मुंबई) येथील टाटा थिएटर येथे त्याना गौरविण्यात आले.
मसुरे – राज्य शासनातर्फे आयोजित लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान २०१६ अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेत विभागस्तरावर मसुरे मायनेवाडीचे सुपुत्र व मुंबई भायखळा येथील प्रसिद्ध मूर्तिकार अशोक परब यांना सर्वोत्कृष्ट मूर्तिकार म्हणून तृतीय क्रमांकाचे पारितोषीक प्राप्त झाले आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानपत्र, मानचिन्ह देऊन नरीमन पॉइंट (मुंबई) येथील टाटा थिएटर येथे त्याना गौरविण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे, खा. अरविंद सावंत, विनित देशमुख, संतोष खामकर, संजय पाटील उपस्थित होते.