दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका तरुणीने शाई हल्ला केल्याने देशभरात खळबळ माजली आहे.
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका तरुणीने शाई हल्ला केल्याने देशभरात खळबळ माजली आहे. ही तरुणी २० वर्षाची असून तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, हे शाईफेक प्रकरण भाजपाचे कारस्थान असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
दिल्ली सरकारने राज्यात सम-विषम वाहन संख्या योजना १५ दिवस राबवली. जनतेने आभार मानण्यासाठी दिल्ली सरकारने हा उपक्रम राबवला होता. केजरीवाल भाषण करत असताना एक तरुणी त्यांच्या जवळ उभी होती. तिने केजरीवाल यांच्यावर शाईफेक करून कागदही भिरकावले. आपण ‘आप’च्या पंजाब विभागाची कार्यकर्ती असल्याचा दावा तिने केला.
दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्ली पोलिसांच्या निष्काळजीपणावर कोरडे ओढले आहेत. हा कट भाजपानेच आखला आहे. ही योजना यशस्वी झाल्याने भाजपाची पोटदुखी वाढली आहे. यात पोलीसही सहभागी झाल्याचा आरोप त्यांनी केला.