सोमालियामधील ‘अल-शबाब’ या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरांवर अमेरिकेच्या लष्कराने ड्रोनच्या सहाय्याने केलेल्या हवाई हल्ल्यात १५० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
वॉशिंग्टन- सोमालियामधील ‘अल-शबाब’ या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरांवर अमेरिकेच्या लष्कराने ड्रोनच्या सहाय्याने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात १५० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
‘अल-शबाब’ ही दहशतवादी संघटना हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यामुळेच ‘अल-शबाब’च्या प्रशिक्षण शिबिरांवर हल्ले करण्यात आल्याची माहिती ‘पेन्टागॉन’चे प्रवक्ते कॅप्टन जेफ डेव्हिस यांनी दिली.