अमेठी येथे प्रचारसभा घेण्यासाठी आलेले आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले.
अमेठी – येथे प्रचारसभा घेण्यासाठी आलेले आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. कुमार विश्वास यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच विश्वास आणि त्यांच्या समर्थकांच्या गाड्यांवर दगडफेकही करण्यात आली.
येत्या लोकसभा निवडणुकीत कुमार विश्वास अमेठी येथून राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर कुमार विश्वास अमेठीमध्ये जनविश्वास सभा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी जमशेदपूर, अमेठी याठिकाणी काळे झेंडे दाखवत त्यांना विरोध दर्शविण्यात आला.
विश्वास यांच्या समर्थकांच्या गाड्यांवर अंडी आणि दगड फेकण्यात आले. जोरदार घोषणाही देण्यात आल्या. मात्र पोलिसांनी निर्दशकांना ताब्यात घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.