भाजपने सोमवारी रात्री अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले.
नवी दिल्ली- भाजपने सोमवारी रात्री अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यावी यावर भाजपमध्ये ब-याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे पारंपारीक मतदारसंघ मानले जातात.
लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट पाहण्याासाठी येथे क्लिक करा.
रायबरेली लोकसभा मतदारसंघातून भाजपने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातील वकील अजय अगरवाल यांना उमेदवारी दिली आहे. तर राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीमधून स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे.
रायबरेलीतून याआधी उमा भारती यांच्या नावाची चर्चा होती. मात्र सोनिया गांधी यांच्याविरोधात अगरवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.