मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना अमर चित्रकथा तर माहीत असतीलच ! इतिहासातील असंख्य लोकप्रिय आणि शूर चरित्रांवर आधारित कथामालिका अमर चित्रकथांतून मांडण्यात आल्या होत्या.
मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना अमर चित्रकथा तर माहीत असतीलच ! इतिहासातील असंख्य लोकप्रिय आणि शूर चरित्रांवर आधारित कथामालिका अमर चित्रकथांतून मांडण्यात आल्या होत्या.
अनंत पै यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चित्रकथा विविध २० भारतीय भाषांमध्येही आल्या. सर्वाधिक विक्री झालेल्या अमर चित्रकथांच्या पुस्तकांनी भारतात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.
या कथांमधील काही निवडक कथा आता तुम्हाला टीव्हीवर पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ४ ते १४ वयोगटातील बालगोपाळांसाठी सुरू झालेल्या ‘झी क्यू वाहिनी’वर आता अमर चित्रकथा कार्टून स्वरुपात पाहता येणार आहेत.
हुशार बिरबल, सम्राट अशोक, पृथ्वीराज चौहान, चाणक्य, स्वामी विवेकानंद, भगतसिंग, मदर तेरेसा, अशा अनेक महान व्यक्तिंच्या जीवनावर आधारित ही कार्टून मालिका असणार आहे.
या मालिकेच्या २६ भागांमधून या आदर्श व्यक्ती आपल्या भेटीला येणार असून प्रत्येक भागात दोन नायक आणि त्यांच्या इतिहासाचा मागोवा घेतला जाईल.
बिरबलाचं चातुर्य, पृथ्वीराज चौहान आणि सम्राट अशोकाची शूरता, भगतसिंगची देशभक्ती, विवेकानंदांचे थोर विचार, शिवाजी महाराजांची लढाऊ वृत्ती आणि मदर तेरेसा यांच्या समाजसेवी वृत्तीच्या रंजक आणि आकर्षक अशा स्वरुपातील या चालत्याबोलत्या कथा पाहताना नक्कीच धम्माल येईल, आणि आपल्या ज्ञानातही भर पडेल. मग, आहात ना तयार आपल्या सुपरहिरोज्ना भेटायला?