मुंबईमध्ये आयोजित अपर क्रस्ट फूड अॅण्ड वाईन शोमध्ये नव्या शेफ्स आणि मिक्सोलॉजिस्ट्ससाठी कलिनरी आणि मिक्सोलॉजी कॉम्पिटिशनचे आयोजन झाले.
मुंबईमध्ये आयोजित अपर क्रस्ट फूड अॅण्ड वाईन शोमध्ये नव्या शेफ्स आणि मिक्सोलॉजिस्ट्ससाठी कलिनरी आणि मिक्सोलॉजी कॉम्पिटिशनचे आयोजन झाले. या शोला अॅग्रिकल्चरल अफेअर्स, यू.एस. कॉन्स्युलेट जनरल, मुंबईसाठी सीनियर अॅग्रिकल्चरल अटॅची, अॅडम ब्रॅन्सन आणि इतर मान्यवरांनी उद्घाटन समारंभास उपस्थित राहून सुरुवात केली.
मुंबई आणि इतर भागातील १७ हून अधिक शेफ्स आणि मिक्सोलॉजिस्ट्सच्या सहभागामुळे कलिनरी आणि मिक्सोलॉजी कॉम्पिटिशनला चांगले यश मिळाले. उत्साही आणि प्रतिभावान शेफ्स यू.एस. क्रॅनबेरीज, वॉशिंग्टनची सफरचंदे, यूएसए पीयर्स, कॅलिर्फोनियाचे अक्रोड आणि यू.एस. पिकन्स अशा यू.एस. प्रीमियम अॅग्रिकल्चरल प्रॉडक्ट्सच्या सर्वोत्तम उत्पादनांचा मुख्य घटक म्हणून वापर करत कल्पक अशा पाकक्रिया बनविल्या.
ट्रायडेंट (वांद्रे-कुर्ला)मधून शेफ्स विकास विभुती आणि हयात्त रिजन्सीमधून विशाल हरीहरण यांना अनुक्रमे या कलिनरी आणि मिक्सोलॉजी कॉम्पिटिशनचे विजेते घोषित करण्यात आले. विजेत्यांना पाककला आयोजन समितीचे सदस्य, प्रतिष्ठित उद्योग आणि यूएसडीए प्रतिनिधी यांनी बनलेल्या प्रतिष्ठित ज्युरीने निवडले.
या पुढाकाराबद्दल बोलताना, यू.एस. प्रीमियम अॅग्रिकल्चरल प्रॉडक्ट्सचे इंडिया रिप्रेझेंटेटिव, कीथ सुंदरलाल म्हणाले, ‘यू एस. प्रीमियम अग्रिकल्चरल प्रॉडक्ट्सच्या वापराणे अशा नावीन्यपूर्ण पाककला बनविण्यासाठी कलिनरी आणि मिक्सोलॉजी कॉम्पिटिशनच्या विजेत्यांचे अभिनंदन करताना मला अतिशय आनंद होत आहे. निश्चितच, स्पर्धकांनी या स्पर्धेला त्यांच्या कामगिरीने एका चांगल्या पातळीवर नेले आहे.
सहभागी स्पर्धकांकडून मिळालेल्या प्रतिसादापासून आम्ही अतिशय प्रोत्साहित झालो असून या शोच्या यशाकडे पाहता, आमच्या प्रेक्षकांना हा शो नक्कीच आवडला याची खात्री वाटते.’
भूजमधील स्त्रियांना मिळाली वेगळी ओळख
काळा घोडा फेस्टिव्हल हे केवळ आपल्या देशापुरते न राहता आता त्याला परदेशी साजदेखील चढतोय. काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलसाठी लोकं वर्षभर वाट पाहतात. हा मुख्य उत्सव बनला असून यामध्ये व्हिज्युअल आर्ट्स, डान्स, म्युझिक, थिएटर, सिनेमा, लिटरेचर, लेक्चर्स, सेमिनार्स आणि वर्कशॉप्स, हेरिटेज वॉक्स याचबरोबर स्ट्रीट फेस्टिव्हलदेखील साजरे केले जातात. यासाठी कोणत्याही प्रकारची फी न आकारता मोफत याचा आनंद लोकांना घेता येतो. यावर्षी देखील मुंबईत होणा-या काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये वेगळेपण दिसणार आहे.
२००१ साली झालेल्या भूजच्या भूकंपामध्ये सर्वस्व गमावलेल्या चार बायकांना पुन्हा लढण्यासाठी आधार दिला तो वेलस्पनच्या दिपाली गोएंका यांनी. आपल्या स्पन या ब्रँडअन्वये गुजरातमधील या बायका विविध आर्ट आणि क्राफ्ट्स तयार करतात. ज्याची विक्री केवळ भारतीय बाजारपेठेत नाही तर जगात होते.
यामध्ये कुशन कव्हर, रजई याचा समावेश आहे. मुख्यत्वे या गोष्टी वेस्टेजपासून तयार केल्या जातात. मात्र वेस्टजपासून तयार करूनही त्याला एक वेगळा साज देण्यात आला आहे. यासाठी या स्त्रियांना प्रशिक्षण देण्यात येते. दिवसाला त्यांना ३०० ते ३५० इतकी मजुरी मिळते.
वेलस्पन इंडिया लिमिटेडच्या सीईओ आणि जॉइंट एमडी दिपाली गोएंका म्हणाल्या की, ‘ या उपक्रमाशी आमची भावनिक जवळीक आहे आणि या उपक्रमाच्या मार्फत आम्ही सामाजिक आणि पर्यावरण अशा दोन्ही समस्यांचे निकारण करत आहोत. स्पनने कच्छच्या स्त्री सबळीकरणाला अतिशय मोठा हातभार लावला आहे.’
केवळ जगण्यालाच नाही तर त्यांना एक वेगळी ओळख यातून वेलस्पनच्या दिपाली गोएंका यांनी मिळवून दिली. सध्या २० प्रसिद्ध रिटेल स्टोअर्समधील १२ स्टोअर्समध्ये स्पन हा ब्रँड उपलब्ध असून तो जगभर पोहोचला आहे.
काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये देखील त्यांचे उत्पादन ‘स्पन वुमेन ऑफ गुजरात’ यान्वये लोकांना पाहता आणि खरेदी करता येणार आहे. काळा घोडा उत्सवाला साधारणपणे २ लाखांच्या वर लोकांची हजेरी लागते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची कला पोहोचावी हाच यामागील उद्देश आहे.