अतिमद्यपानामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढत असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. अतिमद्यपान शरीरात इन्सुलिनचे नियंत्रण करणा-या मेंदूच्या भागावर परिणाम करते.
वॉशिंग्टन – अतिमद्यपानामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढत असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. अतिमद्यपान शरीरात इन्सुलिनचे नियंत्रण करणा-या मेंदूच्या भागावर परिणाम करते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
अतिमद्यपानामुळे शरीरात इन्सुलिनला प्रतिबंध होऊन टाईप टू मधुमेहाची शक्यता वाढते असा निष्कर्ष इकान वैद्यक शाळेने काढला आहे.अतिमद्यपान इन्सुलीनचे नियंत्रण करणा-या मेंदूतील हायपोथॅलमस भागावर परिणाम करत असल्याचे संशोधकांना आढळले. इन्सुलिनला प्रतिबंध झाल्याने टाईप टू मधुमेहाबरोबर ह्दयविकाराचाही धोका संभवतो असे या अभ्यासकांपैकी एक संशोधक ख्रिस्टोफर बटेनर म्हणाले.