ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकीचे निनावी पत्र मिळाले आहे.
मुंबई – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकीचे निनावी पत्र मिळाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नका नाहीतर तुमच्या जीवावर बेतेल अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानानुसार कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पत्र इंग्रजी भाषेत लिहिलेले असून त्यावर सात ऑगस्ट ही तारीख असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
तसेच या पत्रात नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येची आठवणही करुन देण्यात आली आहे. यासोबतत हजारे यांनी राळेगण सिद्धी गावांतच रहावे असेही पत्रात म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.