भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या सहनशीलतेचे कौतुक केले आहे.
बरैली – भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या सहनशीलतेचे कौतुक केले आहे.
‘धोनी खूप चांगला कर्णधार आहे. कठीण परिस्थितून संघाला बाहेर काढण्यासाठी लागणारी सहनशीलता त्याच्यात आहे त्याचबरोबर संघातील इतर सहकारी खेळाडूंशी त्याचा चांगला समन्वय आहे, असे वाडेकर यांनी सांगितले.
आगामी विश्वचषकात भारतीय संघ चांगले प्रदर्शन करेल असा विश्वास व्यक्त करत स्पर्धेसाठी समतोल संघ निवडल्याचे ते म्हणाले. भारतीय संघाचे एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन राहिले आहे. हा खेळ व्यवसायिक बनत चालला आहे मात्र तांत्रिक बाबींमध्ये मोठा फरक पडलेला नाही. खेळाडू कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळू शकतात असे वाडेकर म्हणाले.